inner-banner

नवनगर विकास प्राधिकरण

  • महाराष्ट्र शासनाने दि. 15/10/2024 रोजीच्या अधिसुचनेअन्वये अटल सेतू (मुंबई पारबदंर प्रकल्प) प्रभाव क्षेत्रातील एकूण 124 गावे असलेले क्षेत्र नवनगर म्हणून अधिसूचित केले आहे.  सदर ‘केएससी नवनगर’ करिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची नवनगर विकास प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे.  

  • रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल व पेण तालुक्यातील गावे केएससी नवनगर क्षेत्रात समाविष्ट आहेत.  

  • केएससी  नवनगराचे एकूण क्षेत्रफळ  323.44  चौ.किमी एवढे आहे.  

  • मुंबई पारबंदर प्रकल्प प्रभाव क्षेत्रातील जमिनींच्या प्रत्याशित मूल्यवृद्धीचा वापर केल्याने अटल सेतू  प्रकल्प आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य होईल. त्याचप्रमाणे, सदर क्षेत्रात सुनियोजित आणि एकात्मिकृत विकास साधणे यामुळे  शक्य होईल.  

  • संदर्भित क्षेत्रामधील उद्योगाच्या संधी तसेच अस्तित्वातील दळणवळणाचे जाळे लक्षात घेता सदर क्षेत्रामध्ये औद्योगिक, ट्रान्सपोर्ट हब, लॉजिस्टिक पार्क आणि रहिवास वापरास भरपूर वाव आहे. तसेच माहिती तंत्रज्ञान पार्क (IT & ITeS), विदा केंद्र (Data Centers), वाणिज्य तंत्रज्ञान (Fintech), मिश्र भूवापर (Mixed Land Use), स्मार्ट सिटी (Smart City), वाहतुक केंद्रीत विकास (Transit Oriented Development), प्रादेशिक स्तरावररील पायाभूत नागरी सोईसुविधा (Regional Scale Amenities) आणि एकात्मिक व परवडणारी घरे असे भूवापर प्राधिकरणास प्रत्याशित आहेत; ज्यामुळे रोजगार निर्मिती होऊन महानगर प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेत वृद्धी होईल

  1. प्रस्तावित केएससी नवनगराचे सर्वेक्षण करणे.  

  2. अस्तित्वातील वाहतुकीचे जाळे, उद्योग व दळणवळणाची साधने तसेच पर्यावरण आणि भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करणे.  

  3. अस्तित्वातील भू-वापर नकाशा व अहवाल तयार करून प्रसिद्ध करणे  

  4. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 अन्वये विहित कार्यवाही करुन प्रस्तावित भू-वापर नकाशा शासनास मंजूरीकरिता सादर करणे. 

  5. मंजूरीपश्चात नवनगराच्या विकासाची अंमलबजावणी करणे.  

के एस सी नवनगरातील अस्तित्वातील विकास, दळणवळण व्यवस्था, शासकीय जमिनी, वने, प्रारुप / मंजूर विकास योजना यांची माहिती संबंधित शासकीय कार्यालयाकडून संकलित करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.